GOOD NEWS from Abhijeet & Sukhada Khandkekar | अभिजीत सुखदाने दिली खुशखबर | Lokmat Filmy

2021-09-21 34

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील गुरु म्हणून अभिनेता अभिजीत खांडकेकर घराघरात लोकप्रिय आहे. अभिजीतची पत्नी सुखदा खांडकेकर देखील अभिनेत्री असल्याचं तुम्हाला माहितीच असेल. सुखदा सध्या पुण्यश्र्लोक अहिल्याबाईमध्ये झळकते आहे. सध्या हे दोघे एका पोस्टमुळे चर्चेत आहेत. या दोघांचा एक गोड फोटो अभिजीतने सोशल मीडियावर शेअर करत एक खुशखबर चाहत्यांना दिलीये. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे की, आणि आम्ही 'हो' म्हणालो... आमच्या नवीन पत्त्यावर! आपल्या भिंतींना आनंद कळु दे,प्रत्येक खोलीमध्ये आपलं हास्य समावु दे आणि प्रत्येक खिडकी मोठ्या संभाव्यतेसाठी उघडू दे-असे त्याने लिहले आहे.
हो तुम्ही अगदी बरोबर ओळखलं आहे. अभिजीत आणि सुखदाने नवीन घर विकत घेतलं आहे. आणि ते त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झालेत. ही आनंदाची बातमी अभिजीतने चाहत्यांसोबत शेअर केलीये. त्यानंतर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय.
अभिजीत आणि सुखदा हे मराठी चित्रपटसृष्ट्रीतील आयडल कपल म्हणून ओळखले जातात.एका कॉमन फ्रेन्डमुळे सुखदा आणि अभिजीतची ओळख झाली होती. आणि मग मैत्री आणि त्यानंतर यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं होतं. मग या दोघांनी लग्नगाठ बांधली. (Chitrali VO)

#AbhijeetSukhada #AbhijeetKhandkekar #Sukhada Khandkekar #lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber